श्रीमत ग्रंथराज ग्रंथनाम दासबोध
दशक दुसरा आणि || समास दुसरा : उत्तमलक्षण || २.२ ||
’मी देहच आहे’ ही भावना देहबुद्धीची तर, ’मी आत्माच आहे’ ही भावना आत्मबुद्धीची. “मूर्खपण सांडावें दुरी । उत्तमगुणाची आवडी अंतरीं । म्हणोनि कृपाळूपणें बोले उत्तरीं । श्रीमदाचार्य सिकवण ॥संकु२-३॥ उत्तमगुणांची आवड अंतर्यामी विकास पावावी म्हणून ही उत्तम लक्षणे येथे श्रीसमर्थ अत्यंत हळुवारपणाने नकारात्मकपणाने सांगत आहेत. देहबुद्धी उणावण्यासाठी नीती-धर्माच्या आचरणाची आवश्यकता असते. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिरावणे याचं नाव परमार्थ होय.
॥श्रीराम॥
श्रोतां व्हावें सावधान | आतां सांगतों उत्तम गुण | जेणें करितां बाणे खूण | सर्वज्ञपणाची ||१||
वाट पुसिल्याविण जाऊं नये | फळ वोळखिल्याविण खाऊं नये | पडिली वस्तु घेऊं नये | येकायेकीं ||२||
अति वाद करूं नये | पोटीं कपट धरूं नये | शोधल्याविण करूं नये | कुळहीन कांता ||३||
विचारेंविण बोलों नये | विवंचनेविण चालों नये | मर्यादेविण हालों नये | कांहीं येक ||४||
प्रीतीविण रुसों नये | चोरास वोळखी पुसों नये | रात्री पंथ क्रमूं नये | येकायेकीं ||५||
आता उत्तम गुण सांगत आहे, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे जेणेकरून ते अंगी बाणले असता सर्वज्ञपणाची अर्थात शहाणपणाची प्राप्ती होते. परगावी जायचे असेल तर तेथील रस्त्याची आधी सर्व माहिती करून घेऊन मगच जावे, ओळखीचे फळ नसेल तर ते खाऊ नये. (यदाकदाचित ते फळ आपल्या शरीरास घातक असेल तर अपाय हॊईल म्हणून.) वाटेत पडलेली वस्तु अविचारीपणाने उचलू नये.

प्रसंगी वाद करण्याची वेळ आलीच तर तो मर्यादित असावा,अति नसावा. मनात कपट ठेवून वागू नये, शोध घेऊन चारित्र्यसंपन्न मुलीशीच विवाह करावा. पूर्ण विचार केल्याशिवाय बोलू नये, सखोल विचार केल्याशिवाय आणि त्या गोष्टीला असणार्या मर्यादांचा विचार केल्याशिवाय एकही पाऊल टाकू नये. (हा विचार राजकीय वाटतो.) प्रेम व आपुलकी असल्याशिवाय कोणावरही रागावू नये. येथे चोर म्हणजे अनोळखी माणसाकडे दुसर्याविषयी चौकशी करू नये (त्यामुळे आपला गुप्तहेतू उघड होऊ शकतो. ); रात्रीच्या वेळेला अचानक प्रवासाला निघू नये.(त्या काळाचा विचार करता).
जनीं आर्जव तोडूं नये | पापद्रव्य जोडूं नये | पुण्यमार्ग सोडूं नये | कदाकाळीं ||६||
निंदा द्वेष करूं नये | असत्संग धरूं नये | द्रव्यदारा हरूं नये | बळात्कारें ||७||
वक्तयास खोदूं नये | ऐक्यतेसी फोडूं नये | विद्याअभ्यास सोडूं नये | कांहीं केल्या ||८||
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडों नये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||९||
अति क्रोध करूं नये | जिवलगांस खेदूं नये | मनीं वीट मानूं नये | सिकवणेचा ||१०||
समाजात वावरत असताना आपल्या मनाचा सरळपणा-ऋजुता सोडू नये. वाममार्गाने धनसंचय करू नये, कधीही सदाचरण सोडू नये. परनिंदा व दुसर्याचा द्वेष करू नये, (त्याने आपले मन कलुषित होते.) कुसंगती टाळावी, जबरदस्तीने दुसर्याच्या संपत्तीचे व परस्त्रीचे हरण करू नये. सभेतील वक्त्यास उगीचच वेडेवाकडे प्रश्न विचारून सभेची एकता वा संघटना मोडेल असे वर्तन करू नये. काही झाले तरी विद्याभ्यास सोडू नये. भांडखोर व्यक्तीशी व्यर्थ भांडत बसू नये, वाचाळ-बडबड करणार्याशी वाद घालू नये, अंतःकरणातील संतसंगतीची ओढ उणावू देऊ नये. संतापाचा प्रसंग आला तर क्रोध आवरावा; जिवलग, स्नेही, सोबती, कुटुंबिय याना यातना होतील असे वर्तन करु नये; कोणी हितकारक सांगत असेल तर ते ऐकण्याचा कंटाळा करू नये.
जयजयरघुवीर समर्थ ! जयश्रीराम ! श्रीरामसमर्थ !
در. راجیو پندورنگ ستر
||श्री गुरुदेव दत्त ||॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड. ॐ
ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज,
ॐ सद्गुरूमाता सुनिती पांडुरंग सुतार आईसाहेब (माई) की जय ॐ
ॐ सद्गुरु श्री चिन्मयानंद शंकरनाथ दगडे महाराज कि जय . ॐ
ॐ सदगुरु श्री भक्तवात्सल्य संत तुकामाईनाथ महाराज कि जय.ॐ