नको साधनेचा अतिरेक, ठेवा जागृत विवेक.

साधनेच्या मार्गांतील अतिरेकीपणाचा अजून एक फार मोठा तोटा आहे. तो म्हणजे आपला या प्रयत्‍नांमुळेच आपणास ज्ञानप्राप्ती झाली असे मानण्याचा स्वभाव होणे. आपल्या मनाच्या या अवस्थेमुळे साधनेला आपल्या जीवनात अतिशय मानाचे स्थान निर्माण होते कारण ज्या प्रक्रियेमुळे भगवंत मिळणार आहे तीच्याबद्दल कुणाच्या मनात आत्मीयता उत्पन्न होणार नाही? एकदा एका गोष्टीला प्राधान्य प्राप्त झाले की तीच्या तुलनेने बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या होतात आणि आपोआप आपल्या जीवनात एक साचेबध्दपणा निर्माण व्हायला लागतो.

कमी महत्वाच्या गोष्टी करताना मनात कंटाळा यायला लागतो. केव्हा एकदा साधना करायला मिळेल अशी भावना निर्माण होते. आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे आपण असा विचार करण्यामध्येच धन्यता मानू लागतो. जरा बघा, एखादी गोष्ट आपल्या जीवनात महत्वाची झाली की आपला दृष्टीकोन कसा बदलतो ते. आता तुम्ही असे म्हणाल की मी जी गोष्ट महत्वाची ठरविलेली आहे ती खरोखर महत्वाची आहे,

‘पिंडें पिंडांचा ग्रास । तो हा नाथसंकेतींचा दंश । परि दाऊनि गेला उद्देश । श्री महाविष्णु ॥ ज्ञानेश्वरी ॥’
आपली जडण-घडण अन्नमय, वायुमय, मनोमय, आनंदमय आणि कारणमय अशा पंच पातळींंवर अस्तित्वात आहे. कुणी अन्नमय कोशात अडकलेला असतो तर कुणी मनोमय कोशात असतो. जो ज्या पातळीवर आहे, त्याच्या पुढच्या पातळीत त्याने जाणे म्हणजे त्या पिंडाने आधीच्या पिंडाचा नाश करणे असे आपण समजू शकतो. अशा दृष्टीने पाहिल्यास वरील ओवीत ‘आहे त्या पातळीवरुन पुढच्या पातळीवर जाण्याचा योगमार्ग भगवंतांनी विशद करुन सांगितला’ असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत असे वाटते.

मनात (आपल्यासारखाच!) स्वतःच्या प्रगती करुन घेण्याच्या क्षमतेबद्दल संदेह निर्माण झाला आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणाला की ‘तुम्ही सांगितलेला योगमार्ग अतिशय चांगला वाटतो पण माझ्यात तो मार्ग चालण्याची योग्यता आहे असे मला वाटत नाही.

आता कृष्णा तुवां सांगितला योग । तो मना तरी आला चांग । परी न शके करु पांग । योग्यतेचा ॥ज्ञानेश्वरी ॥
हां हो जी अवधारिलें । जे हें साधन तुम्हीं निरुपिले । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥ज्ञानेश्वरी ॥’
अहो भगवान, तुम्ही सांगितलेला हा मार्ग ज्याला आवडेल त्याने चालावा का त्याची योग्यता असायला हवी? यावर भगवंतांचे उत्तर अतिशय मार्मिक आहे. ते म्हणतात:
‘पै योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तिचि अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिले फळे ॥ज्ञानेश्वरी ॥’

याचा अर्थ असा की ‘योग्यता केव्हा कळते? तर फळ प्राप्त झाल्यावरच! (म्हणजे काम सुरु करण्याआधी ते करायची योग्यता आहे हे आपण कसे बघू शकणार?) आणि समजा योग्यता असली तरी तीच्या जोरावर काम सुरु केल्यावर लगेच फळ मिळते काय? ते जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच मिळणार.’ तेव्हा अर्जुना तू स्वतःच्या योग्यतेचा विचार करीत बसू नकोस! परंतु म्हणून कुणीही केव्हाही उठावे आणि योगसाधनेचे फळ प्राप्त करुन घ्यावे असेही नाही. योग्यता प्रत्येकामध्ये आहे पण व्यवस्थित उपचारांनीच आपल्यातील लायकीचा यथायोग्य विनियोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, बुध्दीने अतिशय हुशार असलेल्या मुलाने काहीच अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत अपयशच प्राप्त होणार. तेव्हा आपल्यातील उपजत गुणवत्ततेचा पूर्ण फायदा करुन घ्यायचा असेल तर काय करायला हवे हे आपण बघायला हवे.

आहार करणाऱ्याला वा मुळीच न खाणाऱ्याला, अति निद्राशील माणसाला वा दुराग्रहाने कधीच न झोपणाऱ्याला योग साधत नाही. जो युक्तीपूर्वक मोजका आहार घेतो आणि स्वतःच्या शरीराचे चलनवलन करतो आणि जागणे व झोपणे हे नियमितपणे करतो त्याचीच योगसाधना सर्वदुःख विनाशकारी होते. जो सर्वकामनांपासून दूर राहील्याने बाह्य विषयांपासून आवरलेले आपले चित्त आत्मरुपात स्थिर करतो त्याला ‘युक्त’ असे म्हटले जाते. अशा स्वतःच्या चित्ताला स्थिर करुन आत्मस्वरुपी लावलेल्या योग्याची अवस्था वर्णन करण्यास निर्वात ठिकाणी असलेल्या दीपाच्या स्थिर ज्योतीची उपमा दिली जाते

तेव्हा एका रुपाला महत्व देण्यात आपण स्वतःचे संपूर्णत्व गमावतो आहे हे लक्षात आले की आपली साधना सुरु झाली आहे असे समजावे. परमार्थात आपले काम स्वतःचा शोध घेणे सुरु करणे एवढेच आहे. बाकी सर्व बघायला भगवंत समर्थ आहे यात शंकाच नाही. चला, आपण सर्व जण आपापल्या शोधात लागू या!

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!