नामस्मरणाचा महिमा

एकदा गरुडाच्या मनात आले की, मी भगवंताचे वाहन अर्थात मी जवळचा, माझ्याशिवाय भगवंत कुठे जात सुद्धा नाहीत. श्रीकृष्णाला माता रुख्मीणी नंतर मीच प्रिय. तरीही श्रीकृष्ण त्या अर्जुनाला कसे काय एवढेे महत्त्व देतात ? अगदी त्याचा रथ सुद्धा चालवला.

एक दिवशी या गरुडाला घेऊन श्रीकृष्ण अर्जुनाकडे आले, तर अर्जुन झोपला होता आणि द्रोपदी त्याच्या डोक्याला तेल मालिश करत होती. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आले तरी हां उठला नाही हे पाहुन गरुडाला अजुनच् राग आला.

पण श्रीकृष्ण हसत हसत त्याच्या डोक्याशी जाऊन बसले आणि द्रोपद्रीला बाजूला करून आपण त्याचे केसाला तेल लाऊ लागले. आता मात्र कहर झाला या विचाराने गरुड़ निघणार तेव्हढ्यात् श्रीकृष्णाने त्याला आपल्या जागेवर बसून अर्जुनचे केस हातात घ्यायला लावले आणि श्रीकृष्ण उठून बाहेर गेले.

रागानेच गरुड बसला. त्या शांततेत त्याला ” श्रीकृष्ण कृष्ण जय जय, श्रीकृष्ण कृष्ण जय जय ” ऐसा मंद आवाज ऐकू येऊ लागला. जप कुठून येतोय हे पाहता गरुडाच्या लक्षात आले, की आपण जे अर्जुनाचे केस हातात घेतलेत त्यातूनच , नव्हे तर अर्जुनाच्या रोमारोमातुन नामस्मरण होत आहे. आणि अर्जुनाची महती गरुडाला कळुन चुकली.

आजच्या युगात सुद्धा संत तुकाराम, संत चोखामेळा आणि श्री ब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा परावाणीने जप होत असे.

मन्त्रजप हां चार वाणीने होतो.

1) वैखरी वाणी – आरती नंतर सामुदायिक जप मोठ्याने करतो तो

2) मध्यमा – ओठ आणि जीभ याद्वारे मन्त्र पुटपुटणे

3) पश्यन्ति – जीभ ओठ न हलवता मंत्र जप करणे

4) परा – अत्यंत उच्चपातळी वर हां जप शरीरातील रोमारोमातून , हृदयातून हां जप आपोआप होत असतो. जैसे की मृत्युनंतरहि चोखामेळाच्या अस्थि जप करत होत्या.

क्रमाक्रमाने आपली सेवा वाढेल तसा वरच्या वाणी मधून जप शक्य होतो.
पण सुरुवात नक्की केली पाहिजे.
सामान्यजणा साठी जप करताना मध्यमा वाणीने आपण माळ घेऊन जप करावा. उजवा हाताचा अंगठा आणि अनामिका यात माळ धरून मधल्या बोटाने एक एक मणी मागे सारावा. एका मंत्राला एकच मणी मागे जाईल याकडे लक्ष्य असू द्यावे.

जप करताना डोळे बंद करून आपले चित्त इतरत्र जाणार नाही हे पहावे. स्वामी आपल्याला सांगतात,

“अनन्यश्चिन्तयन्तोमाम….” याचा अर्थ हाच की आपले चित्त दुसरीकडे न जाऊ देता.

माळ जप करताना मेरु मणी ओलांडू नये, माळ फिरवून घ्यावी.
जप करताना गोमुखी वापरावी जेणे करून माळ कोणाच्या दृष्टिस् पडणार नाही, आणि चुकून माळ हातातून पडली तर जमिनीवर पडणार नाही.

बसायल स्थिर आणि स्वच्छ आसन असावे. फार जाड नाही आणि फार पातळ सुद्धा नाही ऎसे.

आपले आसन माळ इतराना वापरायला देऊ नये.

जप करताना इतरत्र पाहणे, खाणा खुणा करणे प्रकर्षाने टाळावे.

दिवसभरात झालेला जप रात्रि झोपताना सद्गुरुंच्या चरणी अर्पण करावा.

मंत्राची जेवढी अक्षरे असतील तितके लक्ष जप केल्यावर तो मन्त्र सिद्ध होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!