ब्रह्मसूत्र
अध्याय पहिला आणि पाद पहिला
संबंध – या प्रकरणात ’गायत्री’ या शब्द ब्रह्माचा वाचक आहे या गोष्टीच्या पुष्टीसाठी दुसरी युक्ति प्रस्तुत करतात –
भूतादिपादव्यपदेशोपपत्तेश्चैवम् ॥ १.१.२६ ॥
अर्थ – भूतादिपादव्यपदेशोपपत्तेः = (येथे ब्रह्मालाच गायत्री नामाने सांगितले गेले आहे, हे मानण्यानेच) भूत आदिचा पाद दाखविणे युक्तिसंगत होऊ शकते म्हणून; च = ही; एवम् = असेच आहे.
व्याख्या – छांदोग्य (३.१२) या प्रकरणात गायत्रीला भूत, पृथ्वी, शारीर आणि हृदयरूपी चार पादांनी युक्त सांगितले गेले आहे. नंतर, त्याची महिमा वर्णन करताना ’पुरुष’ नामाने प्रतिपादित परब्रह्म परमात्म्याच्या बरोबर त्याची एकता करून समस्त भूतांना (अर्थात् प्राणिसमुदायास) त्याचा एक पाद म्हटले आहे आणि अमृतस्वरूप तीन पादांना परमधामात स्थित सांगितले आहे (छां उ. ३.१२.६ – या मंत्राचा २४ व्या सूत्रातही उल्लेख आला आहे). या वर्णनाची संगति तेव्हाच लागू शकते जेव्हा ’गायत्री’ शब्दास गायत्री छंदाचा वाचक न मानता परब्रह्म परमात्म्याचा वाचक मानले जाते. म्हणून असेच मानणे योग्य आहे.
संबंध – उक्त सिद्धांताच्या पुष्टीसाठी सूत्रकार स्वतःच शंका उपस्थित करून तिचे समाधान करतात –
उपदेशभिदान्नेति चेन्नोभयस्मिन्नप्यविरोधात् ॥ १.१.२७ ॥
अर्थ – चेत् = जर म्हणाल; उपदेश भेदात् = उपदेशात् भिन्नता झाल्याने; न = गायत्री शब्द ब्रह्माचा वाचक होत नाहे; इति न = पण असे म्हणणे योग्य नाही; उभयास्मिन् अपि अविरोधात् = कारण दोन प्रकारे वर्णन असूनही वास्तविक काही विरोध नाही.
व्याख्या – जर म्हटले की पूर्व मंत्रात (३.१२.६) तर ’तीन पाद दिव्यलोकात आहेत’ असे सांगून दिव्य लोकास ब्रह्माचे तीन पादांचा आधार म्हटले आहे, आणि त्यापुढच्या मंत्रात (३.१३.७) ’ज्योतिः’ नामाने वर्णित ब्रह्मास त्या दिव्यलोकाच्या ’पर’ म्हटले आहे. या प्रकारे पूर्वापारच्या वर्णनात भेद असल्याने गायत्रीला ब्रह्माचे वाचक म्हणणे संगत नाही, मग हे कथन ठीक नाही. कारण दोन्ही ठिकाणी वर्णनाच्या शैलीत किंचित् भेद असूनही वास्तविक काही विरोध नाही. दोन्ही ठिकाणी श्रुतिचा उद्देश ’गायत्री’ शब्दवाच्य तसेच ’ज्योति’ शब्दवाच्य ब्रह्मालाच सर्वतोपरी परम धामात स्थित दाखविणे हाच आहे.
संबंध – ’अत एवं प्राणः’ (१.१.२३) या सूत्रात हे सिद्ध केले आहे की या श्रुतीत ’प्राण’ नामाने ब्रह्माचेच वर्णन केले आहे. परंतु कौषितकि उपनिषदात (३.२) तर प्रतर्दनाच्या प्रति इंद्राने म्हटले आहे की ’मी ज्ञानस्वरूप प्राण आहे, तू आयु तथा अमृतरूपाने माझी उपासना कर.’ म्हणून जिज्ञासा उत्पन्न होते की या प्रकरणात आलेला ’प्राण’ शब्द कशाचा वाचक आहे ? इंद्राचा ? प्राणवायूचा ? जीवात्म्याचा ? अथवा ब्रह्माचा ? यावर सांगतात –
प्राणस्तथानुगमात् ॥ १.१.२८ ॥
अर्थ – प्राणः = प्राण शब्द (येथेही ब्रह्माचाच वाचक आहे); तथानुगमात् = कारण पूर्वापरच्या प्रसंगाचा विचार करता असेच ज्ञात होते.
व्याख्या – या प्रकरणात पूर्वापार प्रसंगावर चांगल्या प्रकारे विचार केल्यावर ’प्राण’ शब्द ब्रह्माचाच वाचक सिद्ध होतो, अन्य कशाचाही नाही. कारण, आरंभी प्रतर्दनाने परम पुरुषार्थरूप वर मागितला आहे. ’प्राण’ ब्रह्मच असला पाहिजे. ब्रह्मज्ञानाहून श्रेष्ठ दुसरा कोणताही हितैषी उपदेश असू शकत नाही. याच्या अतिरिक्त उक्त प्राणास तेथे प्रज्ञान-स्वरूप सांगितले आहे, जे ब्रह्माच्या अनुरूप आहे.
तथा अंती त्यास आनंदस्वरूप, अजर आणि अमर म्हटले आहे. नंतर त्यास समस्त लोकांचा पालकही म्हटले आहे** या सर्व गोष्टी ब्रह्मालाच लागू आहेत. प्रसिद्ध प्राणवायु ’इंद्र अथवा जीवात्म्यासाठी’ असे म्हणणे योग्य होऊ शकत नाही. म्हणून असेच समजले पाहिजे की येथे ’प्राण’ शब्द ब्रह्माचाच वाचक आहे.
[** कौषितकि उपनिषदातील प्रसंग : ’स होवाच प्रतर्दनस्तमेव वृणीष्व यं त्वं मनुष्याय हिततमं मन्यस इति .. । (कौ. उ. ३.१); ’स होवाच प्राणोऽस्मि प्रज्ञात्मा’ (कौ. उ. ३.२); ’एष प्राण एव प्रज्ञात्माऽऽनन्दोऽजरोऽमृत … एष लोकपाल, एष लोकाधिपतिः, एष सर्वेश्वरः’ (कौ. उ. ३.९) ]
॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥
॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.
ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ
ॐ सद्गुरूमाता सुनिती पांडुरंग सुतार आईसाहेब (माई) की जय ॐ
ॐ सद्गुरु श्री चिन्मयानंद शंकरनाथ दगडे महाराज कि जय . ॐ
ॐ सदगुरु श्री भक्तवात्सल्य संत तुकामाईनाथ महाराज कि जय. ॐ