विषयबुद्धि पूर्णपणे नाहीशी झाल्यावरच मन समाधीत प्रतिष्ठीत होतं

“मुळात एकाखेरीज दोन तर नाहीत ना? म्हणून कुणी कोणत्याही नावानं त्याला आळवो, तो जर मनोभावाने आळवील तर त्याच्याजवळ नक्कीच जाऊन पोहोचेल. व्याकुळतेतच सारंकाही आलं”. “पुस्तकांत – शास्त्रांत साखर वाळूची भेसळ असते. साधु साखर घेऊन वाळू फेकून देतो. साधु सार ग्रहण करत असतो.” “अलौकिक शक्ति घेऊन काय करायचं? तिच्या साहाय्यानं ईश्वरलाभ का व्हायला? ईश्वराचा जर लाभ होणार नसेल तर सर्वच मिथ्या होय, व्यर्थ होय!”

“एकेका उपाधीमुळं जीवाचा स्वभाव भिन्न भिन्न प्रकारे बदलत जातो. काळ्या किनारीचं धोतर एखादयाला नेसू द्या, की बघा, स्वारी तोंडानं लागलीच निधूबाबूंची प्रेमगीतं गुणगुणायला लागलीच समजा! नंतर मग पत्ते खेळणं, फिरायला निघताना हातात छडी, हे सारं आलंच. पाप्याचा पितर का असेना, बूटमोजे पायात चढविण्याचाच उशीर, लागलीच शीळ घालीत हिंडू लागेल, पायऱ्या चढताना साहेबासारखा उडया मारतच जाईल, एक ना दोन, किती सोंगं! एखादया माणसाच्या कातात कलम पडूच दया की राजेश्री हाती पडेल त्या कागदावर मोठ्या दिमाखानं फर फर करत रेघोटया ओढतील; असला प्रभाव त्या लेखणीचा! पैसा देखील एक अजब उपाधि आहे, पैसा मिळाला रे मिळाला की मनुष्य अगदी निराळाच बनून जातो., मग तो आधीचा मनुष्य राहत नाही.”

“भक्ति कशाने लाभते? त्यासाठी प्रथम साधुसंग करायला हवा. साधुसंग केल्याने ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेनंतर निष्ठा. तेव्हा मग ईश्वरासंबंधी सोडून आणखी कोणतीही गोष्ट ऐकायची इच्छा होत नाही; त्याचेच काम करण्याची इच्छा होते.” पवित्र झाल्याखेरीज पावित्र्य ओळखता यायचं नाही. “स्वत:वर चिदानंदाचा आरोप करा, तुम्हालाही तो आनंद प्राप्त होईल.

आनंद तर मूळचाच आहे, केवळ आवरण व विक्षेप शक्तींनी झाकला गेला आहे.”

“ज्याच्यात ईश्वराठायी खरीखरी भक्ती आहे तो शरीर, पैसा ह्या साऱ्यांची कधीच पर्वा करीत नसतो. तो म्हणतो, ‘देहसुखासाठी, लोकमान्यतेसाठी किंवा पैशासाठी अन् जपतप! हे तर सारे अनित्य, दोन दिवसांचे आहे’.” “अगदी मनापासून प्रार्थना केल्यास स्वस्वरूपाचं दर्शन होऊ शकतं, लक्षात असू द्या. मात्र ज्या प्रमाणात विषयभोगाची वासना असेल त्या प्रमाणात दृष्टी झाकाळून जात असते.” “रात्रंदिवस त्याचंच चिंतन केल्यानं चारी दिशांना तोच दिसू लागतो. दिव्याच्या ज्योतीकडे एकसारखं टक लावून बघितल्यास थोडया वेळानं सगळीकडे ज्योतीच ज्योती दिसतील.”

लज्जा, घृणा व भय ही तीन बाळगल्यास धर्मात प्रगति होत नाही. “कर्म करीत नाही कोण? भगवंताचं मगुणसंकीर्तन हे सुद्धा कर्मच होय. सोsहंवाद्यांचं ‘मीच तो’ हे चिंतन देखील कर्मच. नि:श्वास टाकणेही कर्मच नव्हे का? सुटलंय कुणाला कर्म! म्हणून म्हणतो कर्म करावं, पण फळ ईश्वराला अर्पण करावं.”

“अनुरागखेरीज का तो मिळाला आहे? त्या प्रेमाकरिता मोठमोठे योगी जन्मोजन्म कठोर योगाचरण करीत असतात. एकदा त्या प्रेमाचा उदय झाला की मग भगवान एखादया लोहचुंबकाप्रमाणे त्या भक्ताला आकर्षून घेतात.” “ब्राह्ममुहूर्ती आणि सूर्योदयाच्या वेळी ध्यान करणं चांगलं आणि प्रत्यही “संध्यासमयानंतर.”

“‘मी मुक्त’ असा अभिमान असणं गैर नाही. ‘मी मुक्त’ असंच सदोदित घोकत राहिल्यानं माणूस खरोखरच मुक्त होऊन जातो. उलट ‘मी बद्ध’ ‘मी बद्ध’ असाच जप करीत राहिल्यास ती व्यक्ति बंधनातच गुरफटून पडते.” “भगवान अंतर्यामी आहे. सरळ मनाने, शुद्ध मनाने त्याच्याजवळ प्रार्थना करा, तो सगळं समजावून देईल.” “भक्ताभक्तांचा देखील दर्जा असतो. – काही उत्तम भक्त, काही मध्यम तर काही अधम भक्त असतात. अधम भक्त म्हणतो, – ईश्वर आहे, त्या तिथं आकाशात दूर दूर . मध्यम भक्त म्हणतो, – ईश्वर सर्वांभूती चैतन्यरुपानं – प्राणरूपानं भरला आहे. उत्तम भक्त म्हणतो – ईश्वरच या साऱ्या रूपांनी नटला आहे, जे म्हणून दिसतं ते त्या ईश्वराचंच एकेक रूप आहे. तोच माया, जीव जगात सारं काही बनला आहे. त्याच्या खेरीज मुळी आणखी काही नाहीच.” “संसारी जीवाचे मन गढूळ पाणी होऊन बसले आहे खरे, तरीपण त्यात निवळण टाकल्यास ते पुन्हा स्वच्छ होऊ शकते. विवेक वैराग्य म्हणजेच ते निवळण.”

“मनात निवृत्ति आल्यानेच विवेक येतो आणि विवेक आल्यानेच तात्विक विचार उठतात. तेव्हा मनाला इच्छा होते कालीकाल्पादृमाखाली फिरायला जाण्याची. त्या झाडाखाली गेल्यास, ईश्वरासामीप गेल्यास चार फळं आपोआपच हाती येतील. चार फळं म्हणजे धर्म, अर्थ, काम, व मोक्ष.” “ईश्वर सत् आणि बाकी सारं असत् अशा विचारालाच विवेक म्हणतात. सत् म्हणजे नित्य, असत् म्हणजे अनित्य. जो विवेकी आहे तो जाणत असतो की ईश्वरच वस्तू आणि बाकी सर्व अवस्तू. विवेकाचा उदय झाल्याने ईश्वराला जाणण्याची इच्छा होते.”

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!