चैतन्याची ओळख

चैतन्याची ओळख

एका गुरुकुलातील ही गोष्ट आहे. गुरुजी आपल्या शिष्यांना परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी सांगत होते. गुरु म्हणाले, “परमेश्वर हा एकच असून तू विविध रूपात प्रगट होतो. विश्वामध्ये तू चैतन्याच्या स्वरूपात अनेक रूपांमध्ये प्रकट होतो. त्याची ही विविध रूपे जरी वरवर वेगळी दिसली तरी तो एकच आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर काठी मारली असता ते दुभंगत नाही तसेच परमेश्वराचे एकत्व त्याच्या विविध रूपात प्रकट होण्यामुळे देखील भंग पावत नाही. “

सर्व विद्यार्थी एकाग्रतेने सर्व गोष्टी ऐकत होते. एक चाणाक्ष मुलगा उठला त्याने दोन वाट्या आणल्या आणि त्यातले पाणी दोन वेगवेगळे वाट्यांमध्ये ठेवले व गुरुजींना विचारले,” गुरुजी, हौदातील पाणी काठी मारल्याने नक्कीच दुभंगणार नाही पण आता तेच पाणी दोन वेगवेगळे वाट्यात आहे. आता या दोन्ही वाट्यातील पाण्याचे अस्तित्व पूर्णपणे वेगळे आहे जर आपण असेच ठेवले तर ते कायमचे वेगळेच राहील, म्हणजे केवळ अनेकत्व शिल्लक राहील”.

गुरुनाथ शिष्याचा युक्तिवाद खूपच आवडला. गुरु म्हणाले, तू म्हणतोस तर तसे करून बघू. खरे गुरु शिष्य ला विरोध करत नाहीत. त्यांनी शिष्याला दोन्ही वाट्या तशाच ठेवायला सांगितल्या. त्या वाट यांना कोणीही हात लावणार नाही याचीही सोय केली.

काही महिने गेल्यावर त्यांनी शिष्याला बोलावलेबव सांगितले अरे, तुझ्या त्या वाट्या आण. शिष्य लगेच वाटे घेऊन आला. वाट्यांमध्ये काहीच पाणी शिल्लक नव्हते. गुरूने विचारले आता यातील पाणी गेले कुठे. शिष्य म्हणाला, गुरुजी आपण फार काळ ठेवल्यामुळे त्या पाण्याची वाफ झाली.

मग गुरुजींनी शिष्याला सांगितले, दोन्ही वाट्यातील पाण्याची वाफ झाली केवळ एवढेच नाही ही तर विश्वामध्ये अनेक ठिकाणच्या पाण्याची वाफ होते व ती एकमेकात मिसळून जाते एकदा वाफेत रूपांतर झाले की मग या वाटीतील पाणी किंवा त्या वाटीतील पाणी असा फरक राहत नाही. तसे चैतन्य आहे. ते जेव्हा एकातून एकाच जाते तेव्हा विश्वाचा विस्तार होतो. चैतन्य जेव्हा एकमेकात मिसळते तेव्हा केवळ चैतन्यच शिल्लक राहते. अनेक तत्त्वांमध्ये, विविध रुपात प्रकटलेल्या सृष्टीमुळे मूळ चैतन्यात काहीच फरक पडत नाही. ते आहे तसेच म्हणजे एकच असते.

परब्रह्म निर्गुण-निराकार आहे परंतु ते सगुणातून साकार होते. समुद्राच्या केवळ एक थेंब पाण्याची चव पाहिली तरी ते खारं आहे कळते. त्यासाठी अख्खा समुद्र प्राशन करण्याची गरज नाही. अगदी तसेच चैतन्याच्या छोट्याशा स्वरूपात देखील संपूर्ण चैतन्याची अनुभूती येते. परंतु ती पाहण्यासाठी केवळ डोळ्यांचा उपयोग नाही तर ज्ञानचक्षुंच्या कक्षा देखील रुंदवाव्या लागतील.

श्री. गुंजन हरी देव
सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!