कोरोना मुळे इतर आजारांचे पेशंट गायब कसे झालेे?

सध्या ‘कोरोना’मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल बंद आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणार्‍या पेशंटच्या झुंडी, ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकानांमधील गर्दी… सारे काही थांबले आहे. दवाखाने किंवा पेशंट कुठे गायब झाले? गायब वगैरे काही झालेले नाहीत. कुणी पेशंटच नाही सध्या! त्याची कारणे खालीलप्रमाणे…

1) स्वच्छता: आपण हात वारंवार धुऊ लागलो. सॅनिटायझर वापरायला सुरवात केली. मास्क वापरत आहोत. आणि सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तींमधील अंतर) पाळत आहोत.

2) विश्रांती: आपण पुरेशी विश्रांती घेत आहोत. पुरेशी झोप घेत आहोत. प्रत्येकाने किमान 7 तास झोप घेणे आवश्यक असते. लॉकडाऊनमुळे ही विश्रांतीची, झोपेची गरज पूर्ण होत आहे.

3) तणाव: कमी झालेली स्ट्रेस लेव्हल. बहुतेक आजार हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कुटुंबाला वेळ देता येत आहे. मित्र, नातेवाइकांशी आपण फोनवर संवाद साधत आहोत. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे. यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे.

4) आहार: लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आपोआप हॉटेलींग पूणर्त: बंद झाले आहे. त्यामुळे ‘फास्ट फूड’, चमचमीत मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, रस्त्यावरील खाणे यापासून सुटका झाली. घरचे आरोग्यदायी खाणे आपल्याला आजारापासून दूर ठेवीत आहे.

5) प्रदूषण: लॉकडाऊनमुळे कार्यालये, बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत. कारखाने बंद आहेत त्यामुळे हवेचे, पाण्याचे आणि आवाजाचे प्रदूषण नाही. त्यामुळे प्रदूषणापासून होणारे आजार थांबले आहेत.

6) कोरोना मुळे सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे. त्यातून उद्भवणारे आजार पेशंट कमी झाले आहेत.

‘कोरोना’चा धोका कमी झाल्यावरही आपण ह्या 5 गोष्टींमध्ये सातत्य पाळले तर आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

  • डॉ. अजय कोठारी, संचेती हॉस्पिटल – पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!