Daniel K Inouye ने घेतलेली सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रे आणि छांदोग्योपनिषदातील आदित्याचे (सूर्याचे) वर्णन यांतील साम्य.

काही दिवसांपुर्वी अंकूर आर्य यांचा यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहण्यात आला. त्यात त्यांनी छांदोग्योपनिषदाचा व जगातील सर्वात शक्तीशाली दुर्बीण Daniel K Inouye यांचा संदर्भ देऊन सूर्याच्या पृष्ठभागाविषयी सांगितले होते. याची शहनिशा करण्यासाठी Daniel K Inouyeने घेतलेली सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रे पाहिली. ती छायाचित्रे आणि छांदोग्योपनिषदातील आदित्याचे (सूर्याचे) वर्णन यांतील साम्य पाहून मलाही प्रचंड नवल वाटले.

छांदोग्योपनिषदातील तिसऱ्या अध्यायात आदित्याला देवतांचा मधूरस म्हटलेले आहे. Daniel K Inouye ने घेतलेली सूर्याची छायाचित्रे ही मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आहे. छांदोग्योपनिषदात आदित्याबद्दल जे वर्णन आलेय ते खाली देत आहे –

“ॐ असौ वा आदित्यो देवमधु तस्य द्यौरेव तिरश्चीनवंँशोsन्तरिक्षमपूपो मरीचयः पुत्राः ।।१।।”

अर्थ- “ ॐ हा आदित्य निश्चितच देवतांचा मधू आहे. द्युलोक हीच त्याची तिरकी फांदी आहे, अंतरीक्ष पोळे आहे आणि किरणे मधमाशांची पिल्ले आहेत. ।।१।।”

“तस्य ये प्राञ्चो रश्मयस्ता एवास्य प्राच्यो मधुनाड्यः । ऋच एव मधुकृत ऋग्वेद एव पुष्पं ता अमृता आपस्ता वा एता ऋचः । एतमृग्वेदमभ्यतपंँस्तस्याभितप्तस्य यशस्तेज इन्द्रियं वीर्यमन्नाद्यंँरसोsजायत ।।२-३।।”

अर्थ- “त्या आदित्याची पूर्व दिशेकडील जी किरणे आहेत, तेच ह्या (अंतरिक्ष रुपी पोळ्याची) पूर्व दिशेकडील छिद्रे आहेत. ऋक् हेच मधुकर आहे, ऋग्वेद हेच पुष्प आहे, ते सोमादि अमृतच जल आहे. त्या ह्या ऋक् रुपी मधुकरांनीच ह्या ऋग्वेदाला रचले. त्या अभितप्त ऋग्वेदापासून यश, तेज, कीर्ती, इन्द्रिय, वीर्य आणि अन्नाद्यरुपी रस निर्माण झाला. ।।२-३।।”

वरील मंत्रांमध्ये स्पष्टपणे आदित्याची तुलना ही मधमाशांच्या पोळ्यासोबत केलेली आहे. Daniel K Inouye ने घेतलेले छायाचित्रही खाली पहिल्या फोटोत दाखवले आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, दुर्बीणींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपकरणांचा आविष्कार आत्ताच्या काळातील असताना वैदिक कालीन लोकांना सूर्याच्या पृष्ठभागाविषयीचे ज्ञान कसे प्राप्त झाले ?

कदाचित् असे तर नाही ना की आत्ताचे भौतिकशास्त्रज्ञ उपनिषदांसारख्या ग्रंथांचा आधार घेऊन त्या दिशेने संशोधन करत असावेत ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!