जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?

होय जगात देव आहे.

परंतु माझी देवाची संकल्पना थोडी वेगळी आहे. सर्व प्राणीमात्र सदोदीत सुखाच्या शोधात असतात. अगदी किडा मुंगी पासुन मानवा पर्यंत सर्वांची धडपड सुखासाठीच चालली आहे. या धडपडीमधे जेंव्हा अडचणी येतात त्या वेळी आपल्या पेक्षा जेष्ठ व श्रेष्ठ अशा विभुतिंचा आधार शोधल्या जातो. (हल्लीच्या युगात जेष्ठांचा सल्लासुद्धा घेणे जवळपास बंदच झाले आहे.) ऊरले श्रेष्ठ विभुती!! म्हणजे आपण समजतो तो देव.

कांहीवेळा या देवाला साकडे घालुन अथवा त्याची भक्ती, पूजा अर्चना करुन आपले दुःख/समस्या दुर करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हा संसाराचा खेळ चालवताना एका समस्ये नंतर /दुःखा नंतर त्या मागे दुसरी समस्या व दुःख पुढ्यात येऊन ठेपतेच. सदासर्वकाळच्या चिंता/समस्या/अडचणी शेवटा पर्यंत संपतच नाहीत. दर वेळी नविन देव शोधण्याचा प्रकार होतच असतो.

याचा अर्थ ज्याला आज आपण देव मानतो तो सदासर्वकाळचे सुख देऊ शकत नाही. यावर कांही विचारवंतांचे म्हणने असे की हे तुमच्या मागील जन्माचे कर्म भोग आहेत, ते तुम्हाला भोगावे लागतीलच. त्यात देवानेच तुम्हाला जन्माला घातले असेल व तोच तुमचा controller असेल तर तो या कर्माच्या फेर्‍यात का अडकवतो? कांही ठिकाणी समस्येवर ऊपाय म्हणुन या पैकीच कांही देवांना साकडे घातल्या जाते, म्हणजे मी पाहिलेला प्रसंग असा की शासकिय आॅफिसमधे काम करणार्‍याने अपहार केला व तो साकडे घालत होता, देवालाच लाच देऊ पहात होता, अशी स्थिती झाली आहे की मी कांहिही करीन, या देवाला साकडं घालुन खुष केले की मी पुन्हा मोकळा.

बरे!! हे देव सुद्धा कसे? तर तुमच्या आमच्या सारखेच देहधारी, पोषाख घालणारे, हातात आयुधं असणारे!!! एका जागी स्थिर असणारे.

या देवांकडुन सदासर्वकाळ साठी (अनंत सुखा साठी) जाणे चुकीचे ठरेल. ज्यांनी स्वतःच्याच संरक्षणासाठी आयुधं हाती घेतली आहेत त्यांच्या कडुन आपल्या संरक्षणाची मागणी करणे कितपत योग्य आहे?

अगदी comman sence ने विचार केला तर जगात बंदुक वापरणार्‍याचे ऊदाहरण देता येईल. जो स्वतःच्या जिवाला धोका आहे असे समजतो तोच शस्त्र बाळगतो.

मी अशा देवाच्या शोधात आहे, जो स्वतःमधे पूर्णपणे लीन असेल, निःशस्त्र असेल व स्वतः या मोहमयी संसारातुन मुक्त असेल. जो स्वतःःच्या व्यापातुन मुक्त असेल (कारण बरेच देव कुटूंब कबिल्यासह असतात) सुखी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!