तुकाराम महाराज अभंगगाथा – १६८

काय कळे बाळा ।
बाप सदैव दुबळा ॥१॥

आपला बाप श्रीमंत आहे का गरीब आहे हे लहान मुलास काय समजते ??

आहे नाहीं हें न कळे ।
हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥

आपल्या बापाच्या हातात आपण मागतो ती वस्तू कोणत्या वेळी असते आणि नसते हे त्या लहान मुलास समजत नाही,

देखिलें तें दृष्टी ।
मागे घालूनियां मिठी ॥२॥

ते मूल बाजारात वा कोणाच्या घरि जे बघितले , ते बापाच्या पायाला विळखा घालून मागत असते, आणि बापालाही त्याची समजूत काढावी लागते..

तुका म्हणे भावें ।
माझे मज समजावें ॥३॥

जगतगुरु तुकोबाराय म्हणतात; देवा पांडुरंगा, माझीदेखील स्थिती अशा अज्ञानी मुलाप्रमाणेच आहे, तरी माझ्या मनातील भाव जाणून माझी समजूत काढावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!