तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.४२३

(अघोरी उपासना करणाऱ्यांविषयी तुकोबा ह्या अभंगातून बोलतात -)

फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा ।

फटकाळ विचारा चाळविले ।।१।।

फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त ।

करवितो घात आणिका जीवा ।।२।।

तुका म्हणे अवघे फटकाळ हे जीणे ।

अनुभवि ये खुणें जाणतील ।।३।।
अर्थ –
तुकोबा म्हणतात, जे लोक अघोरी उपासना करतात, त्या अघोरी देवतेचा देव्हाराही फटकाळ (तामसी) असतो. भूतबाधा रोग उतरवण्यासाठी त्यांनी दिलेला अंगाराही फटकाळ असतो. असे हे तामसी लोक भोळ्या भाबड्या लोकांना फसवत असतात. ।।१।।
त्या लोकांचा अघोरी देवही फटकाळ असतो आणि त्या देवाचा भक्तही फटकाळ असतो जो त्याची कार्यसिद्धी होण्यासाठी एखाद्या पशूचा बळी देऊन त्याचा घात करतो. ।।२।।
तूकोबा म्हणतात, अशा रितीने अघोरी लोकांचे सगळे आयुष्यच फटकाळ (तामसी) असते. ज्यांना अध्यात्मातील खरे मर्म कळते, त्यांना ह्यातील फोलपण लगेच लक्षात येईल. ।।३।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!