ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ – २२

नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १ ॥
नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २ ॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥

सतत हरीचें नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पति विष्णु असतो. ॥ १ ॥

नेहमी नारायण हरि, नारायण हरि, अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरीं सर्व ऐश्वर्य व सलोकतादि चारी मुक्ति असतात ॥ २ ॥

जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावें, आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यमलोकास जातो, आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. ॥ ३ ॥

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तिनाथ, त्यांस हरीचें नाम केवढें आहे असा आपले एच्छेनुरूप प्रश्न केला असतां, त्यावर गुरु निवृत्तिनाथांकडून आकाशापेक्षांही नाम मोठें आहे असें उत्तर मिळालें. ॥ ४ ॥

*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।*

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.
ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः

ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ
ॐ सद्गुरूमाता सुनिती पांडुरंग सुतार आईसाहेब (माई) की जय ॐ
ॐ सद्गुरु श्री चिन्मयानंद शंकरनाथ दगडे महाराज कि जय . ॐ
ॐ सदगुरु श्री भक्तवात्सल्य संत तुकामाईनाथ महाराज कि जय. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!