दासबोध:- दशक पहिला आणि समास दहावा : नरदेहस्तवन

ग्रंथ नाम दासबोध
दशक पहिला आणि समास दहावा : नरदेहस्तवन || १.१० ||

माणसाच्या बुद्धीची व कल्पनेची पातळी अत्यंत उच्च प्रतीची असल्याने त्यास ज्ञेय वस्तुचा अर्थ समजणे, त्यांचे अंतरंग शोधणे, अनेकात्वातील एकत्व पाहणे, सान्ताकडून अनंताकडे झेप घेणे, या विश्वाच्या अफाट नियमांचे आकलन करणे वगैरे ज्ञानाच्या क्रिया फक्त माणूसच करु शकतो. स्वतःसह विश्वाच्या अंतरंगात खेळणारे सच्चिदानंदस्वरुप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य फक्त माणसांतच आहे. त्यासाठीच या नरदेहाचे प्रयोजन आहे. “या परमार्थाची सांठवण । तो हा नरदेहचि जाण । म्हणोनि नरदेहवर्णन । दशमीं केलें ॥संकु१-४५॥“

॥श्रीराम॥

संत महंत ऋषी मुनी | सिद्ध साधू समाधानी | भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी | विरक्त योगी तपस्वी ||२२||
तत्त्वज्ञानी योगाभ्यासी | ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी | षट्‍दर्शनी तापसी | नरदेहींच जाले ||२३||
म्हणौनि नरदेह श्रेष्ठ | नाना देहांमध्यें वरिष्ठ | जयाचेनि चुके आरिष्ट | येमयातनेचें ||२४||
नरदेह हा स्वाधेन | सहसा नव्हे पराधेन | परंतु हा परोपकारीं झिजऊन | कीर्तिरूपें उरवावा ||२५||
अश्व वृषभ गाई म्हैसी | नाना पशु स्त्रिया दासी | कृपाळूपणें सोडितां त्यांसी | कोणी तरी धरील ||२६||
संत, महंत, ऋषि, मुनी इत्यादि हे सारे मानवी देहातच झाले. इतर लक्षावधी योनींच्या तुलनेत हा नरदेह श्रेष्ठ असून या भव- सागरातील जन्ममरणाचे फेरे चुकवून, यमयातनांचे संकट टाळण्याची क्षमता यात आहे. हा नरदेह स्वतंत्र आहे, सहजासहजी तो पराधीन होत नाही, म्हणून तो नरदेह सतत परोपकारासाठी झिजवून कीर्तिरुपाने अमर व्हावे. घोडा, बैल, गाय, इतर पशु यासह स्त्रीदासी यांना कृपाळूपणाने संरक्षणाशिवाय मोकळे सोडले तर, त्यांचे कोणी तरी हरण करतात असा अनुभव येतो. (समर्थांचे काळी यवनसत्ताधारी स्त्रीबालकांवार अनन्वित अत्याचार करत असत, त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावे असा याचा मथितार्थ होय. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या रोषाची तमा न बाळगता, श्रीसमर्थांनी अनेक स्त्रियांना ज्ञानदान करून महंत पदी बसवले, आणि त्यांचंच अनुकरण करून पुढील काळांत समाजसुधारकांनी करून स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिलं. )

तैसा नव्हे नरदेहो | इछा जाव अथवा राहो | परी यास कोणी पाहो | बंधन करूं सकेना ||२७||
नरदेह पांगुळ असता | तरी तो कार्यास न येता | अथवा थोंटा जरी असता | तरी परोपकारास न ये ||२८||
नरदेह अंध असिला | तरी तो निपटचि वायां गेला | अथवा बधिर जरी असिला | तरी निरूपण नाहीं ||२९||
नरदेह असिला मुका | तरी घेतां नये आशंका | अशक्त रोगी नासका | तरी तो निःकारण ||३०||
या नरदेहाला सहसा असं कोणतंही बंधन पडत नाही. इच्छेनुसार तो कोणाच्या बंधनात राहील वा न राहील, पण बहुतेक वेळा त्याला तसे कोणी बंधनात ठेवण्याचा विचार करत नाही. जर तो पांगळा किंवा थोटा असेल तर त्याच्या कार्यकर्तृत्वाला खूपच मर्यादा येतात. अंध असेल तर तो वायाच गेला असे होते, तर बधिर असेल तर अध्यात्मिक निरुपणाला मुकला असे होते. मुका असेल तर शंकासमाधान करुन घेता येत नसते, तर अशक्त, रोगी असेल तर निष्कारण वाया गेला असे होते.

नरदेह असिला मूर्ख | अथवा फेंपऱ्या समंधाचें दुःख | तरी तो जाणावा निरार्थक | निश्चयेंसीं ||३१||
इतुकें हें नस्तां वेंग | नरदेह आणी सकळ सांग | तेणें धरावा परमार्थमार्ग | लागवेगें ||३२||
सांग नरदेह जोडलें | आणि परमार्थबुद्धि विसर्लें | तें मूर्ख कैसें भ्रमलें | मायाजाळीं ||३३||
नरदेह जर मूर्ख अज्ञानी असेल किंवा फेफर्‍यासारख्या आजाराने दुःखी असेल तर तो निश्चितपणे अकारण जन्माला आला असे समजावे. यापैकी एकही व्यंग नसेल, शरीर धडधाकट असेल तर तत्परतेने परमार्थपंथ स्वीकारावा. उत्तम नरदेहाचा लाभ होऊनही जर परमार्थाकडे दुर्लक्ष झाले तर तो मूर्ख मायजाळात भ्रमला असेच समजावे.

जयजयरघुवीर समर्थ ! जयश्रीराम ! श्रीरामसमर्थ !
در. راجیو پندورنگ ستر

||श्री गुरुदेव दत्त ||॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड. ॐ

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज,
ॐ सद्गुरूमाता सुनिती पांडुरंग सुतार आईसाहेब (माई) की जय ॐ
ॐ सद्गुरु श्री चिन्मयानंद शंकरनाथ दगडे महाराज कि जय . ॐ
ॐ सदगुरु श्री भक्तवात्सल्य संत तुकामाईनाथ महाराज कि जय.ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *