शत्रूकडून सोडलेल्या क्षेपणास्त्राचा वेध घेणारे प्रतिक्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुर्वीही भारतात वापरले जात होते. द्वारका नगरीच्या सीमांवर अशी प्रतिक्षेपणास्त्र पद्धती असल्याचे उल्लेख महाभारतात मिळतात.

सोपशल्यप्रतोलिका साट्टाट्टालकगोपुरा ।सचक्रग्रहणी चैव सोल्कालावातपोथिका ।।

– द्वारकेतील रस्त्यांवर ठिकठिकाणी विषारी लोखंडाचे काटे पसरवून ठेवलेले होते, गोदामांमध्ये युद्धाकाळात पुरेल एवढी अन्नसामग्री साठवून ठेवलेली होती, शत्रूच्या आक्रमणांना रोखण्यासाठी मोर्चेबंदी करण्यात आलेली होती तसेच शत्रूकडून सोडलेल्या अग्नीने युक्त अस्त्रांना हवेतच नष्ट करणारी सुरक्षापद्धतीही कार्यान्वित केलेली होती.(महाभारत, वनपर्व, अध्याय१५, श्लोक ६)