श्रीसंत नामदेव महाराज कृत हरिपाठा मध्ये अभंग क्रमांक पहिला मध्ये भगवान श्रीरामाचे नामजपाचे महत्व सांगितले आहे.
नामाचा महिमा कोण करीं सीमा।
जपावे श्रीरामा एका भावे।।१।।
न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे।
वर्णिजे बा वकत्रे श्रीरामनाम।।२।।
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी।
तरीच मुखाशी नाम येत।।३।।
नामा म्हणे महा जप परम।
तो देह उत्तम मृत्युलोकी।।४।।

अर्थ:-संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात,नाम महात्म्य अगाध आहे याची सीमा कोणीही करू शकत नाही, रामनामाचा जप एकनिष्ठेने करावा तो उच्चरण्यास स्तोत्र,मंत्र,यंत्र याची जरुरी नाही. मुखाने रामनामाचे वर्णन करावे.ज्या प्राण्याच्या पदरी अनंत पुण्यराशी असतील,तोच मुखाने नाम घेईल.संत नामदेवराय म्हणतात,
“जो रामनामाचा जप करतो त्याचा देह मृत्युलोकी उत्तम जाणावा।।