तुमचिये दासीचा दास करुनि ठेवा।
आशीर्वाद द्यावा हाचि मज॥१॥
नवविधा काय बोलली जे भक्ती।
द्यावी माझ्या हातीं संतजनीं॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्याआधारें ।
उतरेन खरें भवनदी॥३॥
तुमच्या दासाचाही दास करून मला तुमच्या सेवेत ठेवा आणि मला आशीर्वाद द्या.॥१॥
वेद पुराणातील नवविधा भक्ती माझ्याकडून तुम्ही करवून घ्या. ॥२॥
तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या चरणाच्या आधाराने मी हा संसार सागर पार करीन॥३॥