श्री संत तुकाराम गाथा

“एका भेवा परमानंद” “२४३”

काय तो विवाद असो भेदाभेद !
साधा परमानंद एक भावे !!

निघोनि आयुष्य जाते हातोहात !
विचारी पां हित लवलाहीं !!

तुका म्हणे भाव भक्ती हें कारण !
नागवी भूषण दंभ तोचि !!

अर्थ :- एकनिष्ठपणे भाव धरुन परमानंद मिळवा . भेदा-भेद वाद – विवाद करणे , फुकट आहे . हातोहात तुमचे आयुष्य निघुन जाईल . आपल्या हिताचा विचार लवकर करा . तुकाराम महाराज म्हणतात , दंभाने वागल्यास आगावपण आहे .