सध्याचे वातावरण व एकूण परिस्थिती पाहून 2012 मध्ये लिहिलेल्या एक लेखाची प्रकर्षाने आठवण आली,
आनंदपथ वाचकांसाठी सादर

या विश्वाचे नियंत्रण करणारी एक महान शक्ती आहे,याबद्दल सर्व धर्मशास्त्र-तत्ववेत्त्यांचे एकमत आहे,त्याचे वर्णन कठीण!तो निर्गुण-निराकार?तो आहे कसा? ह्याचे वर्णन अनेक भक्त तत्त्वचिंतक करतात,
शफी देहलवी यांनी हमदे बारी तआला(त्या सर्वश्रेष्ठ अशा परमात्म्याचे स्तवन)मध्ये केलेले वर्णन मनोज्ञ आहे.

वह आंखो मे फिरता है दिल मे मकीं है।
किसीं ने मगर उसको देखा नही हैं।।
अगर देखीये उसको हर जा वही है।
न देखे कोई तो कही भी नही है।।

प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्या अस्तित्वाचे आविष्कार दिसतात,जरी कोणी पहिला नाही तरी काळजात त्याचे अस्तित्व असावे असे मानतात,मानलात तर प्रत्येक जीवात आहे ,न मानलात तर कुठेच नाही,त्यासाठी श्रध्दा हवी,ज्ञानाचे नेत्र खुलायला हवे,काही नास्तिक सोडले तर प्रत्येकाच्या ओठावर त्याचे नाव आहे,पुढे शफी म्हणतात,

मकाम उसका हद्दे नजर से है आगे।
नजर जिस जगह है वहा वह नही है।।
तू खादिम जिसे जा बजा ढुंडता है।
वह परदा नशी तेरे दिल मे मकीं हैं।।

प्रत्येकाने स्वतः मध्येच देश काल वर्तमानाचे भान राखून शोध घ्यायला हवा असे हे परमतत्व!!
आपल्या शोधात सर्वांचे प्रेम शुभेच्छा घेऊन वाटचाल करावी हे योग्य ठरेल ,खरे ना?