सगुण रुपाची आवश्यकता

shreesmaran

भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो.

चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता ॥

आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक्‍त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यसाधारण आहे.‘समाजाची विभागणी चतुर्वणात मीच सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या आधारे केली आहे. ह्या क्रियेचा कर्ता मी आहे असे जरी भासले तरी या सर्वांत मी अकर्ता आणि अविनाशी आहे असे जाण. (माझ्या)कुठल्याही कर्माचा लेप मला लागत नाही आणि केल्या कर्माच्या फळाची मला अजिबात इच्छा नाही. मला असे जाणून जो आपले कर्म करतो तोही स्वतःच्या कर्मांच्या बंधनात अडकत नाही. मला असे पूर्ण जाणून मगच भूतकाळातील मोक्षाची आस्था असलेल्यांनी कर्मे केली (आणि त्यायोगे ते मुक्त झाले). तेव्हा तूसुध्दा पूर्वकाळच्या मूमुक्षुंनी केलेल्या कर्माप्रमाणे कृती कर (आणि स्वतःचे भले करुन घे).

’न मां कर्माणि लिंपंति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बद्ध्यते ॥ गीता

॥‘योग: कर्मसु कौशलम्‌’ म्हणजे काय तर कर्मे करण्यातील कुशलता म्हणजे खरा भगवंताशी योग होय. परंतू इथे कुशलता म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. द्वितीय अध्यायातील या शब्दांचा आधार घेऊन स्वतःसमोर आलेली कर्मे आपली सर्व शक्‍ती पणाला लावून, मनापासून, करावीत हाच कर्मयोग आहे असे कुणी म्हणतात. परंतु तसे जर असते तर पाश्चात्य संस्कृतीत आणि पौर्वात्य संस्कृतीत काहीच भिन्नता दिसली नसती. समाजात पुढे जाण्यासाठी कर्मे कुशलतेने करणारे आणि भगवंताच्या जवळ जाण्याकरीता कर्मे करण्यात मन लावणारे यांत काय फरक दिसला असता? जीवाचा आटापिटा करुन नोकरीत पुढे जाण्याच्या धडपडीला ‘मी देवाने सांगितल्याप्रमाणे कर्मातील कुशलता आचरणात आणत आहे’ असे म्हणणारे लोक उच्च साधक ठरले असते. त्यांची भगवंताशी जवळिक दिसली असती. आणि अशा संसारामधील प्रगतीबद्दल आसक्‍ती ठेवून कर्मे करणाऱ्यांमध्येही त्यांच्या मनाच्या योगस्थितीचे दृश्य रुप म्हणजे मनाची अखंडित शांतता दिसली असती. परंतु ही शांतता नोकरीत पुढे जाण्याची इच्छा धरणाऱ्यांच्या जीवनात तीच्या अभावानेच जाणविते, तीच्या अस्तित्वाने नाही!! तेव्हा कर्म करण्यातील कुशलता म्हणजे हातातील कर्म तन-मन पणाला लावून पार पाडण्याची वृत्ती नाही हे स्पष्ट होते.बुध्दीयोगाने म्हणजे निव्वळ विवेकाने आपले जीवन जगून भगवंताकडे जाणारे लोक अतिशय विरळा असतात.भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. ‘मी भगवंताचा औंश आहे’ असे म्हटल्यावर सर्व जगत् आपल्याला भगवत्स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहात नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहू या. जगात भगवंतावाचून सत्य वस्तू नाही आपले शरीर असत्य आहे ही ज्याची निष्ठा तोच खरा. भगवंत असण्याची जी स्थिति तिचे नाव भक्ति; आणि हा सर्व विस्तार माझा नाही त्या भगवंताचा आहे या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य. हा शुद्ध विचार असणे हाच विवेक आहे.*ईश्वर परमश्रेष्ठ अव्यक्त तत्व आहे हे आपण हे आपण पाहिले. ते अव्यक्त आहे म्हणूनच निराकारही आहे. कारण एखादी वस्तू व्यक्त होते तेव्हा त्याला कोणतातरी आकारप्राप्त होतो. मग तिला काही तरी नाव मिळते. म्हणजेच नाम व रूप हे साकार वस्तूचे असते. अशी आकार धारण केलेली वस्तू ‘दृश्य’ होते ‘जड’ होते. पण परमात्मा दृष्टा, साक्षी आहे. स्वःताचा कोणताही आकार त्याला नाही.

‘हा लोकत्रयाकार | जो जयाचा विस्तार | जेथ नाम वर्ण आकार | चिन्ह नाही ||परब्रह्माच्या ठायी एकोहं असे स्फुरण होते. त्यातून मूळमाया निर्माण होते. समीर म्हणजे वायु. वारा नव्हे. मायेमधील सूप्त वायुतत्व तीच जाणती कळा. हे जे चैतन्य आहे तो ईश्वर किंवा सर्वेश्वर म्हणून ओळखला जातो.॥

श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमःॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयातॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जगात देव आहे का? आणि असेल तर कसा आणि कुठे आहे?

होय जगात देव आहे. परंतु माझी देवाची संकल्पना थोडी वेगळी आहे. सर्व प्राणीमात्र सदोदीत सुखाच्या शोधात असतात. अगदी किडा मुंगी पासुन मानवा पर्यंत सर्वांची धडपड सुखासाठीच चालली आहे. या धडपडीमधे जेंव्हा अडचणी येतात त्या वेळी आपल्या पेक्षा जेष्ठ व श्रेष्ठ अशा विभुतिंचा आधार शोधल्या जातो. (हल्लीच्या युगात जेष्ठांचा सल्लासुद्धा घेणे […]
error: Content is protected !!