तो काळ बानुगडे पाटील साहेबांचे शिवाजी महाराजांच्या वरील व्याख्याने मोबाईलवर फेमस होण्याचा काळ होता.तेच आपले मुंबईचा निर्जंन रस्ता,मुसलमान मुलगी,हिंदू घर, शिवाजी महाराज फोटो..वैगेरे वैगेरे वैगेरे…अंगावर शहारे आणणारे चढउतार.. बोलताना रडतोय की काय असा भाव.अगोदरच शिवाजी महाराजांच्या केवळ नावाने भावनीक होणार समाज असल्या व्याख्यानाने जास्तच भाऊक झाला आणि मग गावोगावी पाटील साहेबांची व्याख्याने पहायला तरुणाई गर्दी करु लागली.मारुती 8000 मधून येणारे पाटिल साहेब इनोव्हा आणि नंतर त्यापापेक्षाही सुपर गाडीतून येऊ लागले.पाकीट सुद्धा मजबूत.परत सेक्रेटरी वैगेरे फोन उचलू लागले.पण जाऊदे ही गोष्ट…
शेजराच्याच गावात बानुगडे पाटील अर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत म्हणूण एका गणेश मंडळातील पोरांनी भिडे गुरुजींना आनुया का म्हणून प्रस्ताव मांडला.सर्वांनी दुजोरा दिला…त्यांची समजूत झाली की किमान पाटील साहेब घेतात तितके तरी द्यावे लागणार नाही.अर्थात हा त्यांचा मोठा गैरसमज होता.ही मध्यस्ती करायची जबाबदारी शेवटी आमच्यावरच आली.उसळते रक्त आणि श्रीशिवप्रतिष्ठान मध्ये पूर्णवेळ कार्य यामुळे लगेच जायचे ठरले….
भेट अर्थातच पहाटे.घाटावर व्यायाम झाला आणि गुरुजींच्या दर्शनाने विषयाला हात घातला.गुरुजींनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि म्हणाले की किती संख्या जमवू शकाल?
गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले की हजार दीड हजार लोक तर सहज येतील.
गुरूजी म्हणाले एवढ्या कमी मानधनात आम्ही येत नसतो.किमान 5 हजार तरुण मुले असतील तर विचार करु… मुलांना समजेना काय उत्तर द्यावे…पण 5 हजार जमवू,तसा प्रचार करू असे म्हटल्यावर तारीख वैगेरे ठरली आणि गुरुजी येणार ही बातमी सर्वत्र पसरली.बॅनर लागले,माईकवरून प्रचार सुरू झाला.
गुरुजी आले.अतिशय जबरदस्त भाषण झाले.शिवराज्याभिषेक का महत्वाचा हा विषय 3 तास समजून सांगितला.भाषण संपले आणि गणेश मंडळ वाले जाडजूड पाकीट घेऊन गुरुजींच्या जवळ आले.गुरुजींनी एकक्षण पाहिले आणि काय आहे विचारले…
गुरुजी हे आमच्याकडून मानधन आहे…एकजण उतरला….
गुरुजी हसले आणि बोलले…
कसले मानधन…या जमलेल्या समुदायात एकाला जरी मी बोललेल्या गोष्टी उमगल्या तर मला मानधन मिळाले.जे काम शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी केले ते काम आपल्याला करायचे आहे.हे सारे जीवन त्यासाठी खर्ची घालू.हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज संभाजी महाराज मानधन घेऊन फिरले नाहीत.तुकोबाराय म्हणतात….

“जेथे करावे कीर्तन,तेथे अन्न न सेवावे
बुक्का लावू नये गळा,माळा घालू नये गळा,
तट्टा रुषभासी दाणा, ऋण घेऊन नये जाणा,
तुका म्हणे देती घेती ते नरकासी जाती”

अहो,विठ्ठल आणि भागवत सांगायला गावोगावी फिरणारे तुकोबाराय मानधन घेत असतील का हो?

हे पवित्र आणि उदात्त कार्य समाजाला सांगणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते मोफत केले पाहिजे.मी माझ्या स्वतःच्या खर्चाने येणार,जाणार..मला कोणी आणायला सोडायला यायचे नाही.रोज रात्री मला श्रीशिवाजी महाराजांना,संभाजी महाराजांना,आई तुळजाभावनीला या सगळ्याचा हिशोब द्यावा लागतो….

चला निघतो मी.नमस्कार.

गुरुजींनी बाजूची कापडाची पिशवी उचलली…डोक्यावर ची पांढरी टोपी जीर्ण झाली होती पण स्वच्छ धुतली होती.गुरुजी वळाले आणि मागे न बघता निघून गेले….

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते…………

स्त्रोत : श्री गजानन जगदाळे

https://www.facebook.com/gajanan.jagdale.7